जिल्हा परिषद शाळा

शाळा

सवणस खुर्द गावात शैक्षणिक सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. गावात प्राथमिक मराठी शाळा व प्राथमिक मराठी शाळा (ऊर्दू) असून दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून मूलभूत शिक्षण दिले जाते. तसेच गावात अंगणवाडी व अंगणवाडी (ऊर्दू) केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमधून ० ते ६ वयोगटातील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण, पोषण आहार व आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात. मराठी व ऊर्दू दोन्ही भाषांत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याने सर्व समाजघटकांना शिक्षणाचा लाभ मिळतो. एकूणच, सवणस खुर्द गावाच्या शैक्षणिक व बालविकासात या संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहेत..

  • विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध प्रयत्न केले जातात.
  • येथे शिक्षणासोबतच संस्कार, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते
  • पर्यावरण दिवस, स्वच्छता मोहिम.